Employees Medical Bill Reimbursement Scheme
The scheme for reimbursement of medical bills of the employees of the University is has been started from June 2016 vide MC resolution dated 12/4/2016 and 24/5/2016.
Reimbursement of medical & hospital bills of up to Rs.3 Lacs is given to all the regular teaching & non teaching employees of the University.
विद्यापीठ कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना
- सदर योजना दि.१०/६/२०१६ ते दि.०९/६/२०१७ या एक वर्षाच्या कालावधी पुरती असून सदर योजना विद्यापीठातील सर्व नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी लागू राहील.
- सदर योजने अंतर्गत विद्यापीठ कर्मचारी अथवा त्यांचे कुटुंबीय यांच्यावर झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती विद्यापीठा मार्फत केली जाणार आहे.
- सदर योजने मध्ये वैद्यकीय खर्चासाठी कोणत्याही प्रकारे अग्रिम रक्कम मिळणार नसून कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या आजाराकरिता होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती सदर योजनेच्या नियम व अटींच्या अधीन राहून केली जाणार आहे.
- कर्मचारी यांच्या कुटुंबियांच्या व्याखेत केवळ कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती, मुलगा अथवा मुलगी ( जिचे वय २८ वर्ष पेक्षा कमी असेल व जे कर्मचाऱ्यावर पूर्णतः आर्थिक दृष्ट्या अवलंबून असतील) अश्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्याच्या वडील अथवा आई यांच्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाणार नाही.
- वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी प्रति कर्मचारी रु.३ लाख इतकी मर्यादा ठेवण्यात आलेली असून या मर्यादेपेक्षा जास्त होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाणार नाही.
- वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती ही तज्ञ समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून केली जाणार असून सदर समितीचा निर्णय अंतिम राहील.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेचा फॉर्म वित्त व लेखा विभागातून खरेदी करून सदर फॉर्म व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आरोग्यकेंद्रात सादर करावा.
विद्यापीठ वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना नियम व अटी:
- सदर योजना विद्यापीठ कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना या नावाने ओळखली जाईल.
- सदर योजना दि.१०/६/२०१६ ते दि.०९/६/२०१७ या काल्वाधीसाठी लागू राहणार आहे.
- विद्यापीठाचे नियमित कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनाच केवळ या योजनेचा फायदा मिळणार आहे.
- विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या व्याख्येत पुढील व्यक्तींचा समावेश असेल- कर्मचाऱ्याची पत्नी अथवा पती, कर्मचाऱ्यावर आर्थिक दृष्ट्या पूर्णतःअवलंबून असणारा/असणारी ;मुलगा अथवा मुलगी (केवळ २८ वर्षाखालील). या व्यतिरिक्त कोणत्याही नातेसंबंधित व्यक्तींच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येणार नाही.
- सदर योजनेनुसार प्रति कर्मचारी जास्तीजास्त रु.३ लाखापर्यंतचा खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येईल. सदर मर्यादेच्या वरील वैद्यकीय खर्चाची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यावर राहील. सदर आर्थिक मर्यादा विद्यापीठातील सर्व नियमित कर्मचारी यांच्यासाठी समान असेल.
- सदर योजनेसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या वेतनामधून कोणत्याही प्रकारची आर्थिक कपात करण्यात येणार नाही.
- वैद्यकीय खर्चाच्या देयकांची छाननी व प्रतिपूर्ती मान्य करण्यासाठी विद्यापीठाने विद्यापिठातील संबंधित तज्ञ लोकांची समिती नेमलेली असून सदर वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल.
- खालील यादीत नमूद केलेल्या आजारांवरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येणार नाही.
- कॉस्मेटीक सर्जरी, त्वचेवरील उपचार (त्वचेचा कर्करोग वगळून)
- दंतरोग,दंत चिकित्सा
- लेसर उपचार (मोतीबिंदू वरील उपचार वगळून)
- मानसिक रोग, व्यसनमुक्ती उपचार, समुपदेशन खर्च
- आयुर्वेदिक, होमिओपॅथीक,युनानी व तत्सम उपचारपद्धती.
- भौतिकोपचार पद्धती (रुग्णालयात केली गेलेले भौतिकोपचार सोडून)
- मेडिकोलीगल केसेस. (अशा केसेस मध्ये कोणत्या उपचारांची प्रतिपूर्ती द्यावी याबद्दलचा निर्णय तज्ञ समिती घेईल.)
- तिसरी अथवा त्यापुढील प्रसूती.
- ओपीडी तपासणी उपचार
- रक्तचाचणी खर्च (हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतरच्या रक्ततपासणी खर्च वगळून)
- क्ष किरण, सी.टी.स्कॅन, एम आर आय तपासणी किंवा विविध विकसित निदान पद्धती Advanced Radiological Investigations यांचा खर्च (अपवादात्मक आजारासाठीचा निर्णय तज्ञसमिती घेईल.)
- वैद्यकीय उपचार हे शासन मान्यताप्राप्त रुग्णालय,नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक अथवा नर्सिंग होम मध्येच घेतलेले असावेत. नॉन अलोपाथिक डॉक्टरांकडून अथवा तत्सम रुग्णालयांमधून घेतलेले उपचार यांची प्रतिपूर्ती देण्याबाबतचा निर्णय तज्ञ समितीचा राहील.
- कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपकरणाची (उदा: चष्मा, वॉकिंग एड्स किंवा तत्सम उपकरणे) यांच्या प्रतिपूर्ती देण्यासंबंधीचा निर्णय हा प्रत्येक वैयक्तिक दाव्याचा विचार करून तज्ञ समिती देईल. सदर निर्णय कर्मचाऱ्यावर बंधनकारक असेल.
- वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती बद्दलचा तज्ञ समितीचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा शंका असल्यास कर्मचाऱ्याने लेखी स्वरुपात विद्यापीठ कुलसचिव यांच्या कडे अर्ज करावा. अशा प्रसंगात मा.कुलगुरू महोदय सदर अर्जावर योग्य तो निर्णय घेतील व तो निर्णय कर्मचाऱ्यावर बंधनकारक राहील.
- वरील नमूद सर्व नियम व अटी मध्ये वेळोवेळी योग्य व आवश्यक ते बदल करावयाचा अधिकार विद्यापीठास आहे.
- संबंधित कर्मचाऱ्याने वैद्यकीय खर्च प्रतीपुर्तीचा प्रस्ताव सादर करताना वैद्यकीय खर्चाच्या देयका सोबत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेचा फॉर्म व सोबत सर्व आवश्यक ती कागद पत्रे जोडून प्रस्ताव विद्यापीठ आरोग्य केंद्रात सादर करावा..
|